Sambhaji Nagar News Saam Tv
क्राईम

Shocking News: अरे बापरे! पोलीस ठाण्यातील शासकीय पैशांवर पोलिसानेच मारला डल्ला; कुठे घडला हा प्रकार?

Rohini Gudaghe

Sambhaji Nagar Crime News

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) अलीकडे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. विविध घटना उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झाल्यानंतर आपण पोलिसांकडे जातो. त्यांची मदत घेतो. सामान्य नागरिकांसाठी पोलीस अधिकारी हे मोठं आधाराचं ठिकाण आहे. पण जर या सरकारी अधिकाऱ्यांनीच फसवणूक केली तर, कधी विचार केलाय का? असा विचार करायला लावणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर येत आहे. ही घटना नक्की काय आहे, ते आपण जाणून घेऊ या. (Latest Crime News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या बँक खात्यातून एका सहाय्यक फौजदाराने 3 लाख रूपये काढल्याची (Assistant Faujdar Fraud) घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या शासकीय पैशांवरच फौजदाराने हल्ला केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय निधीत अफरातफर

पोलीस ठाण्यातील बँकेच्या व्यवहारांची जबाबदारी असलेल्या सहाय्यक फौजदारानेच बँक खात्यातून 3 लाख 4 हजार रुपये परस्पर काढले आहेत. या प्रकरणी शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला (Sambhaji Nagar News) आहे. रामदास शांताराम गायकवाड, असं या फसवणूक करणाऱ्या सहाय्यक पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

पोलीस ठाण्याचा मेंटेनन्स, तपासासाठी लागणारा निधी, लाईट बिल असा खर्च मोहरील फंडातून केला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या या व्यवहारांची सहाय्यक फौजदार रामदास शांताराम गायकवाड यांच्याकडे होती. ते एप्रिल २०२१ पासून हे व्यवहार सांभाळत होते. तेव्हापासूनच त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यातून शासकीय निधी काढून घेतला (Police Station Bank Account) होता. त्याची कुठेही नोंद केली नव्हती. ते हा निधी परस्पर वापरत होते.

शासकीय पैशांचा वैयक्तिक खर्चासाठी वापर

नवनियुक्त पोलीस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला. त्यामध्ये त्यांना अनियमता आढळून आली. त्यानंतर एकूण संपूर्ण प्रकार समोर आला (Sambhaji Nagar Crime) आहे. त्यांनी एकूण निधीतील ३ लाख ४ हजार रूपये वैयक्तिक खर्चासाठी वापरले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक देवकते करत आहेत.

सहाय्यक फौजदाराने शासकीय पैशांचा वैयक्तिक खर्चासाठी वापर केल्याचं संभाजीनगरमधून समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली (crime news) आहे. जर रक्षकच भक्षक बनत असतील, तर सामान्य जनतेचं काय होणार असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT