RTI ACTIVIST BRUTALLY MURDERED IN VIRAR, PALGHAR SHOCKED BY DAYLIGHT ATTACK saam tv
क्राईम

Virar Crime: भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; विरार हादरलं!

RTI Activist Killed in Virar: विरार पूर्वेतील शिरगाव खदानीत RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या झाली आहे. आत्माराम पाटील माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.

Bharat Jadhav

  • विरारमध्ये RTI कार्यकर्त्याची भरदिवसा निर्घृण हत्या.

  • आत्माराम पाटील यांचा मृतदेह शिरगाव खदानीत सापडला.

  • हल्ला मंडळ अधिकाऱ्यांसमोरच घडल्याने खळबळ उडाली आहे.

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. आत्माराम पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत RTI कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. विशेष म्हणजे ही घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. या हल्ल्यात प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झालेत. त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात खदान मालक महेश पाटील याचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणाचा तपास करणारे सुहास बावचे, पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील खदानीबाबत तक्रार आली होती. ही तक्रार अमित चौधरी नावाच्या व्यक्तीने दिली होती. या तक्रारीवरून तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडलाधिकारी प्रभाकर पाटील पाहणी करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी क्रेसर, खदानी संदर्भातील लोकांनी आत्माराम पाटील आणि मंडळ अधिकारी यांना लाठीकाठीने आणि दगडाने मारहाण केली. आत्मराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणात 10 ते 12 जणांनी ही हत्या केली असून, 2 जणांना ताब्यात घेतले आहे तर अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले आहेत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महेश पाटील, आणि त्यांचे वडील, मुलगा आणि इतर सहकाऱ्यांनी आत्मराम पाटील यांची हत्या केली. दरम्यान आत्माराम पाटील हे माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेक बेकायदेशीर कामांचा पर्दाफाश करत असत.

दरम्यान विरारच्या शिरगाव खदान प्रकरणातील मृत आत्माराम पाटील यांच्या कुटुंबीयांचा विरार पोलीस ठाण्यात राडा घातला आहे. आगरी समाजातील सर्व पुरुष महिला विरार पोलीस ठाण्यात एकत्रित येत न्याय देण्याची मागणी केली. आमच्या वडिलांना जर न्याय दिला नाही तर आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही. मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून टाकू अशी कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल अर्ध्या तासापासू कुटुंबीयांनी विरार पोलीस ठाण्यात राडा घालण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवरा-बायकोमधील वाद टोकाला भिडला,पतीनं पत्नीचा गळा चिरला अन्...; दुहेरी हत्याकांडानं नांदेड हादरलं

मोदींच्या आवाहनाविरोधात पवार-ठाकरे आक्रमक, 'चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?'

Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

Cranberries Benefits: क्रेनबेरीज खाण्याचे जबरदस्त फायदे; शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'हे' फळ आहे सुपरफूड

अजितदादांनंतर राष्ट्रवादीत 'पॉवर गेम'? पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं? सुनेत्रा पवारांच्या पत्राने राजकीय भूकंप!

SCROLL FOR NEXT