अलिशान हॉटेलमध्ये थरार! ५ अन् १० वर्षांच्या मुलींचा गळा आवळला; पोलिसांच्या हाती लागली 'ती' चिठ्ठी

Bengaluru hotel father kills daughters : बंगळुरूतील आलिशान हॉटेलमध्ये ५ आणि १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची त्यांच्या वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bengaluru hotel father kills two minor daughters case
Bengaluru hotel father kills two minor daughters caseSaam TV (AI Image)
Published On

Bengaluru hotel father kills two minor daughters case : बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये ५ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची त्यांच्याच पित्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एस. जी. इम्रान (वय ४०) असे आरोपी पित्याचे नाव असून, हत्येनंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत सापडलेल्या आरोपीला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीत कौटुंबिक वाद आणि पत्नीवरील संशयाचा उल्लेख असल्याचे समजते.

२ मुलींची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागचे नेमके कारण आणि परिस्थितीचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती उत्तर-पूर्व बंगळुरूचे डीसीपी (DCP) जी. के. मिथुन कुमार यांनी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट (चिठ्ठी) जप्त केली आहे. या चिठ्ठीतील मजकुरावरून कौटुंबिक कलह आणि पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Bengaluru hotel father kills two minor daughters case
भूकंपाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं; १३० हून अधिक जणांचा मृत्यू, २००० जण बेपत्ता; भीषण दृश्यांनी जग सुन्न

हॉटेलच्या खोलीत ५ अन् १० वर्षांच्या मुलींचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान आपल्या ५ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना घेऊन बंगळुरूतील एका नामवंत अलिशान हॉटेलमध्ये थांबला होता. रविवारी हॉटेलच्या खोलीतच त्याने दोन्ही निष्पाप मुलींची गळा आवळून हत्या केली. मुलींचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यावर इम्रानने स्वतःही विष प्राशन करून किंवा गंभीर दुखापत करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Bengaluru hotel father kills two minor daughters case
Accident : साताऱ्यात मध्यरात्री भयंकर अपघात, महागड्या कारचा चक्काचूर, पुण्यातील ४ मित्रांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

पत्नीवर संशय अन् सुसाईड नोट मधील धक्कादायक खुलासा

हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खोलीचा दरवाजा उघडला असता, दोन्ही चिमुरड्यांचा मृतदेह पडलेला आढळला, तर इम्रान गंभीर अवस्थेत तळमळत होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत इम्रानने आपल्या कौटुंबिक आयुष्यातील वाद, पत्नीसोबतचे गंभीर मतभेद आणि तिच्यावर असलेल्या चारित्र्याच्या संशयाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे आणि घरात रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून त्याने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com