Blood type heart attack risk: कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो अधिक

Surabhi Jayashree Jagdish

O आणि नॉन-O ब्लड ग्रुपमध्ये फरक

O ब्लड ग्रुपच्या तुलनेत A, B आणि AB म्हणजेच नॉन-O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सुमारे 9 टक्के अधिक आढळला. या निष्कर्षासाठी संशोधकांनी विविध अभ्यासांचा एकत्रित मेटा-विश्लेषण केला.

high cholesterol | saam tv

वॉन विलेब्रॅण्ड फॅक्टर

नॉन-O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये वॉन विलेब्रॅण्ड फॅक्टरचं प्रमाण तुलनेने जास्त असू शकतं. हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रोटीन आहे. त्याचं वाढलेलं प्रमाण रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने हार्ट अटॅक जोखमीवर परिणाम होऊ शकतो.

blood type heart attack risk | saam tv

A ब्लड ग्रुप आणि कोलेस्ट्रॉल

A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असण्याचा संबंध काही अभ्यासांमध्ये आढळलाय. रक्तातील वाढलेलं LDL कोलेस्ट्रॉल हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं कारण आहे.

non-O blood group | saam tv

गॅलेक्टिन-3 प्रोटीन

नॉन-O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये गॅलेक्टिन-3 या प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधनात नमूद करण्यात आलंय. हे प्रोटीन शरीरातील सूज आणि हृदयाच्या संरचनेवर होणाऱ्या काही प्रक्रियांशी संबंधित आहे.

O blood group | saam tv

कोणत्या आजारांचा अभ्यास झाला?

या संशोधनात O आणि नॉन-O ब्लड ग्रुपमधील हृदयाशी संबंधित विविध जोखमींची तुलना करण्यात आली. यामध्ये हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि हार्ट फेल्युअरचा समावेश होता. याशिवाय हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित घटनांमधील मृत्यूदराचाही अभ्यास करण्यात आला.

A blood group heart attack risk | saam tv

ब्लड ग्रुप एकमेव कारण नाही

संशोधनातून ब्लड ग्रुप आणि हार्ट अटॅकच्या जोखमीमध्ये संबंध दिसून आला असला तरी त्यावरून हार्ट अटॅक येईलच असं नाही. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि कौटुंबिक इतिहास यांसारखे अनेक घटक हा धोका वाढवतात.

blood group and heart health | saam tv

हार्ट अटॅकचा धोका कसा तपासावा?

ब्लड ग्रुपची माहिती डॉक्टरांना हृदयाशी संबंधित आरोग्य समजून घेण्यासाठी इतर गोष्टींसोबत उपयोगी ठरू शकते. यासोबत कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, वय, लिंग आणि इतर आरोग्यविषयक गोष्टीही पाहणं महत्त्वाचं आहे.

coronary artery disease | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

LDL cholesterol | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Healthy lifestyle | saam tv
येथे क्लिक करा