Reel Star Exposed: Viral Influencer Caught In 1760 Crime Scandal 
क्राईम

रील स्टारपासून सावधान! रील स्टार निघाले अट्टल चोर, 50 हजार फॉलोअर्स, 1760 कारनामे

Influencer Arrested for Theft Cases: रीलस्टार पासून सावधान. हे आम्ही का म्हणतोय. कारण एका रील स्टारचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असा प्रकार समोर आलाय..नेमकं काय घडलंय. रील स्टार वादाच्या भोवऱ्यात का सापडलीय, पाहूयात.

Suprim Maskar

  • काही रिलस्टारचे धक्कादायक कारनामे समोर

  • अहिल्यानगरसह अनेक ठिकाणी कारनामे केल्याची पोलिसांची माहिती

  • 50 हजार फॉलोअर्सच्या आडून चोरी आणि फसवणुक

सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रत्येकाला रील स्टार व्हावसं वाटतं असतं. आपण ही अनेक रील स्टारर्सना फॉलो करतो, लाईक करतो. एखाद्याची रिल आवडल्यास आपण ती शेअरही करतो. मात्र प्रत्यक्षात या रिलस्टारचे कारनामे थक्क करणारे असेच आहेत. मात्र काही रिलस्टारचे धक्कादायक कारनामे समोर आलेत. रिलस्टारर्सनी असं नेमकं काय केलं की सोशल मीडियाऐवजी त्यांच्या कारनाम्यांचीच मोठी चर्चा होऊ लागलीय.पहिली घटना आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील.

सोशल मीडियावर 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या 19 वर्षीय कोमल काळे ही बसमधील महिलांची पर्स चोरत असल्याचं पोलीस तपास समोर आलयं.या चोरीत कोमलचा प्रियकर सुजित चौधरी तिला मदत करायचा. या बंटी बबलीच्या जोडीनं महागड्या फोनसह साडेसहा तोळे सोने आणि 9 लाख 35 हजार रुपये चोरल्याचं पोलीस तपासात समोर आलयं. हे दोन्ही आरोपी अट्टल चोर असल्याचं उघड झालयं.

दुसरीकडे डोंबिवलीतही अशीच घटना घडलीय. इन्स्टाग्रामवर मैत्री करून महागड्या बीएमडब्ल्यूसारख्या गाड्यांची रेलचेल दाखवत रिलस्टार असणाऱ्या शैलेश रामुगडे याने एका तरुणीला फसवलयं. सुरुवातीला तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेची तब्बल 92 लाख 75 हजार रुपयांना फसवणुक केली. विशेष म्हणजे तरुणीची फसवणुक करताना आरोपीन ईडीनं 1 कोटी रुपये जप्त केलेत आणि ते सोडवायचे आहे, असा बनाव केला. आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून दागिने, चार महागडे मोबाईल, बीएमडब्ल्यू कार जप्त केलीय.

सोशल मीडियावर मैत्री करून महागड्या गाड्यांचा दिखावा, मॉडेलिंगचे ग्लॅमर, भविष्यातील लग्नाचे आश्वासन देऊन याआधीही अनेकांनी तरुणींची फसवणुक केल्याचा प्रकार घडलाय. त्यात आता या दोन्ही घटनेनं रिलस्टारचे कारनामे उघड झालेत.आता सोशल मीडियावरील रिलस्टारर्सच्या किती आहारी जायचं आणि त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Health : ताप-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, १५ वर्षांचा मुलगा थेट व्हेंटिलेटरवर, वाचा डॉक्टर काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Maharashtra Politics : "काय म्हणताय धाराशिव?" सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

SCROLL FOR NEXT