

Summary -
१९ मिनिटांचा MMS व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमधील तरुणीची आत्महत्या केल्याचा व्हिडीओ व्हायरल
MMSमध्ये दिसणाऱ्या मुलीने चिंतेत येऊन संपवलं आयुष्य
आत्महत्या केलेल्या तरुणीचा व्हिडीओ वेगळा असल्याचा दावा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. १९ मिनिटं ३४ सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फेसबुक, ट्विटर, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर या व्हिडीओची चर्चा होत आहे. हा व्हिडीओ एका व्यक्तीचा प्रायव्हेट व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण खरंच हा व्हिडीओ खरा आहे की नाही हे आपण पाहणार आहोत...
१९ मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी या घटनेचे मीम्स तयार केले असून ते देखील व्हायरल होत आहे. या मीम्सच्या कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण व्हिडीओची लिंक मागितली जात आहे. लिंक प्लीज, मला व्हिडीओ पाठवा अशाप्रकारचे मेसेज केले जात आहे. स्कॅमर याचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत. अनेक बनावट अकाऊंट लिंक इन बायो असे लिहून लोकांना आकर्षित करत आहेत.
तर अनेकांनी MMS मधील तरुणीला दुसरी मुलगी समजून तिच्या कमेंट सेक्शनमध्ये '१९ मिनिटांचा व्हिडीओ' अशी कमेंट करायला सुरूवात केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'स्वीट जन्नत' असल्याचे अनेकांना वाटत आहे. ते तिलाच कमेंट्स करत व्हिडीओ पाठवण्याची मागणी करत आहेत. या स्वीटने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ती मुलगी मी नसल्याचे सांगितले. तुम्ही मला जी मुलगी समजत आहेत ती मी नाही. ती ऐवढं सांगते तरी देखील नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत '५०० ते ५००० रुपये देतो व्हिडीओ पाठवा' अशा कमेंट करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह दिसत असून तिच्या आजूबाजूला अनेक जण रडताना दिसत आहेत. तसंच पोलिस घटनास्थळी चौकशी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ १९ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचा असल्याचे सांगितले जात आहे. MMS व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पण फ्री प्रेस जर्नलने केलेल्या तथ्य तपासणीमध्ये हा दावा पूर्णपणे खोटो असल्याचे सांगितले. व्हिडीओमध्ये दिसणारी मृत मुलगी ही MMS मधील तरुणीसारखी दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.