Ratnagiri Crime News Saam Tv News
क्राईम

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथील एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Prashant Patil

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथील एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संतापजनक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार दाभोळमध्ये घडला आहे. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात गंभीर दखल घेत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी या शिक्षकाचं तातडीने निलंबन केलं आहे. किशोर येलवे असं या नराधम संशयित शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांकडून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी रत्नागिरी येथे केली आहे. दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेतच्या शिक्षकाने ५वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत अश्लील कृत्य केलं आहे. दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी घरी निघाली होती. शाळेतील या शिक्षकाने तिची विचारणा करत तुला घरी नेण्यासाठी कोण आलं नाही का? असं विचारलं. त्या मुलीकडून नाही असं उत्तर येताच हा शिक्षकही तिच्या मागोमाग घराकडे गेला. शिक्षकाने त्याच्या दुचाकीवरून तो विद्यार्थिनीच्या घराकडे गेला.

घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाही याचाच फायदा घेत या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या शरीरावर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील कृती करत कोणाला सांगू नको अशी धमकीही दिली. घाबरलेल्या या विद्यार्थिनीन घडला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरी आई-वडिलांना हा सगळा प्रकार कळतात त्यांनी थेट दाभोळ पोलीस स्टेशन गाठत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT