Rajasthan Crime News Saam Digital
क्राईम

Rajasthan Crime News: राजस्थान हादरलं! आईने केली पोटच्या ४ मुलांची हत्या; स्वत:लाही संपवण्याचा केला प्रयत्न

Rajasthan Crime News: राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार मुलांची हत्या केली आहे. पाण्याच्या टाकीत बुडवून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थानमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार लेकरांची निघृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

महिला आत्महत्या करताना शेजारच्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन सर्वांना बोलावले. आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक घटनास्थळी पोहचले. लोकांनी महिला आणि तिच्या मुलांना टाकीतून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांना या चारही मुलांना मृत घोषित केले.

बामेरच्या धाणे तालुक्यातील तळा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी ४ वाजता ही घडली आहे. मात्र, रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियानी माहिती दिली आहे. चारही मुलांच्या आईनेच त्यांना टाकीत घालून मारले, असं त्यांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली.

हेवा देवी असे आईचे नाव आहे. तर संजू (वय ९), मंजू (वय ११), दिनेश (वय ५), कृष्णा (वय ७) असे मृत मुलांचे नाव आहे. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ती महिला मुलांना घेऊन शेतात आली होती. तिने मुलांना पाण्याच्या टाकीत ढकळले.

कौटुबिंक वादातून उचललं मोठं पाऊल

कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. महिला तिच्या मुलांसह शेतात जात असताना तिचा सासू-सासऱ्यांसोबत जोरदार वाद झाला. तिचा नवरा मजुरीचे काम कारतो. घरी भांडण झाले त्याच रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

SCROLL FOR NEXT