RAJASTHAN WEDDING MURDER: YOUTH STABBED TO DEATH IN JHALAWAR AFTER ARGUMENT Saam tv
क्राईम

Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

Rajsthan Murder Crime News : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात लग्नसमारंभात वादातून तरुणाची चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • राजस्थानच्या झालावाडमध्ये लग्नसमारंभात हत्या

  • किरकोळ वादातून चाकू हल्ला; युवकाचा मृत्यू

  • उपचारादरम्यान मृत्यू

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला

राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील कोथला घट्टी गावात रविवारी एका लग्नसमारंभात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला. मेहुणीच्या लग्नाला आलेल्या भाऊजीची साडूने हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित मेहुणीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोडक येथील रहिवासी नानुराम यांचा २६ वर्षीय मुलगा बबलू भिल हा आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी कोथला घट्टी येथे आला होता. बबलू भिल याचा वाद झालावाड शहरातील संजय कॉलनीत राहणाऱ्या कमलेश नावाच्या तरुणासोबत झाला. सुरुवातीला किरकोळ भांडण वाटणारा हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला.

वाद वाढताच कमलेशने संतापाच्या भरात बबलूवर चाकूने हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. बबलू गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. त्याला तातडीने कुटुंबीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरक्तस्राव झाल्यामुळे सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मंदावर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच आरोपी कमलेशला लगेच ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT