Punjab DSP Dalbir Singh Deol Death Saamtv
क्राईम

Punjab Crime: पंजाबमध्ये डीएसपींची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह; परिसरात खळबळ

Punjab DSP Dalbir Singh Deol Death: जालंधर जिल्ह्याचे डीएसपी दलबीरसिंग देओल यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (१ जानेवारी,) बस्ती बावा खेल कालवाजवळील रस्त्यावर डीएसपी दालबीरसिंग देओल यांचा मृतदेह आढळून आला.

Gangappa Pujari

Jalandhar News:

पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्याचे डीएसपी दलबीरसिंग देओल यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (१ जानेवारी,) बस्ती बावा खेल कालवाजवळील रस्त्यावर डीएसपी दालबीरसिंग देओल यांचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकांसोबत त्यांचा वाद झाला होता, या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस्ती बावा गेमजवळ एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला असता तो डीएसपी दलबीर सिंह यांचा असल्याचे समजले. सुरूवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

मात्र पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या मानेत गोळी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शरिरावर जखमाही होत्या. विशेष म्हणजे त्यांची सर्विस रिवॉल्व्हरही गायब होती. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे बलविंदरसिंग रंधाव यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत त्यांच्या मित्रांनी 31 डिसेंबरच्या रात्री पार्टीनंतर त्यांनी दलबीरसिंग देओल यांना बस स्थानकाच्या पाठीमागे सोडले होते. त्यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षकही सोबत नव्हते, अशी माहिती दिली आहे. पंजाब पोलीस सध्या बस स्टँडच्या आसपास सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत.

दरम्यान, हत्येच्या आधी दलबीर यांची जालंधरच्या एका गावातील लोकांशी वादावादी झाली होती. तेथे त्यांनी लायसनच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबारही केला होता. दुसऱ्या दिवशी या गाववाल्यांसोबतचा वादही मिटविण्यात आला होता. यामुळे ही हत्या का झाली? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT