Pune crime news Saam Tv
क्राईम

Pune Police : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई; महिलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लूटमार करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीच्या म्होरक्याला कर्नाटकात पकडले. दोन वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद.

Alisha Khedekar

  • पुणे ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई; आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद

  • महिलांचे अपहरण व लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दोन वर्षे होता फरार

  • महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात गुन्हे नोंदलेले; कलबुर्गीतून अटक

  • पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करून महिलांचे व अल्पवयीन मुलींचे अपहरण, अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार करणारा आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल असलेला आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार याला अखेर जेरबंद केले आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये लोणावळा उपविभागात पोलिसांना माहिती मिळाली होती की, हनुमान टेकडी परिसरात महिलांना व अल्पवयीन मुलींना पळवून आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. यावेळी दोन साथीदारांना अटक झाली, मात्र टोळीचा म्होरक्या फरार झाला होता. त्याने लोणावळा स्टेशन परिसरातून एका महिलेला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. तसेच घरात आणखी दोन अल्पवयीन मुलांना साखळदंडात डांबून ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण, लूटमार, पोक्सो कायदा व बाल न्याय कायदा यांतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले गेले. आरोपीवर महाराष्ट्रात ४, गुजरातमध्ये २ व कर्नाटकमध्ये १ असे गुन्हे दाखल आहेत. तो साबरमती कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर गेली दोन वर्षे फरार होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कर्नाटकातील कलबुर्गी येथे लपल्याचे समजले. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक कलबुर्गी येथे गेले व मालखेड पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश मिळाले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, एस.डी.पी.ओ. श्री. गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT