Pune Crime Police Seized Narcotics  Saam Tv
क्राईम

Pune Crime: पुण्यात पुन्हा सापडला मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा; २३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त

Pune Crime Police Seized Narcotics : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २३ लाख रुपयांच्या किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी एकला अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती हा येरवडा येथील राहणारा आहे.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुणे शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा सापडलाय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय. या ड्रग्सची किंमत २३ लाख रुपये असून याप्रकरणात अहमद खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. अहमद खान कोणत्या ड्रग्स रॅकेटचा भाग आहे का? याबाबत पोलीस चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान पुणे शहरात याआधीही ड्रग्स सापडले होते. आता परत शहरात ड्रग्स सापडल्याने खळबळ उडालीय. गुन्हे शाखेने अहमद खानकडून ११० ग्रॅम वजनाचा MD ड्रग्सचा साठा जप्त केलाय. अटक करण्यात आलेल्या अहमद खान हा येरवडा भागातील राहणार आहे. त्याचा कोणत्या रॅकेटशी संबंधित आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलमुळे पुणे शहर चर्चेत आले होते. ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता.

ललित पाटील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर २ कोटी १४ लाखांचे ड्रग्स सापडले होते, त्यानंतर पुण्यातील ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते. या रॅकटेचा तपास करताना अनेक मोठ्या व्यक्तींचा यामध्ये हात असल्याची माहिती उघड झाली होती. पुणे शहरातील कुरकूंभ येथे ड्रग्ज कारखाना सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या ड्रग्ज प्रकरणाचे थेट लंडन कनेक्शन असल्याचं समोर आलं होतं.

यावरुन कसबा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवरवर गंभीर आरोप केले होते. मागील वर्षी पुण्यात एका आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पदार्फाश झाला होता. ३७०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यातील १८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज लंडनमधून मागवण्यात आले होते. कोट्यवधींचे ड्रग्ज बनवण्याचे रसायन वीरेंद्र सिंग बरोरिया नावाच्या व्यक्तीने पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. इतकेच नाही तर पुणे पोलिसांनी पुणे, सांगली आणि दिल्ली ड्रग्स जप्त केली होती.

येथे सापडलेले कोट्यवधींच्या ड्रग्जच्या साठ्यात संपूर्ण केमिकल वीरेंद्रसिंग बरोरिया याने पुरवले होते. वीरेंद्र सिंग बरोरिया हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड संदीप धुनियाचा जवळचा सहकारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT