Pune Crime: पुण्यात दरोडेखोर डिलिव्हरी बॉय, आधी रेकी मग घरफोडी

Delivery Boy Robber : तुम्ही ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर सावधान. नाहीतर ऑनलाईन डिलिव्हरीच्या नावाखाली तुमच्या घराची रेकी करून दरोडा घातलाच म्हणून समजा.
Pune Crime
Delivery Boy Robber Saam Tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

तुमच्या एका क्लिकवर चमचमीत खाद्य पदार्थ थेट तुमच्या दारात येतात. मात्र हे खाद्य पदार्थ घेऊन येणारा खरोखर डिलिव्हरी बॉय आहे की लुटारु. याची खात्री करा. कारण पुण्यात झोमॅटो बॉयचा युनिफॉर्म घालून घरांची रेकी करत घरफोडी करून कोट्यवधींची लूट करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. झोमॅटो बॉय असल्याचं भासवून रेकी करणाऱ्या आणि त्यानंतर घरफोडी करणाऱ्या टोळीने पुण्यात धुमाकूळ घातला होता.

या टोळीने पुण्यात तब्बल 13 घरफोड्या केल्याचं समोर आलं. घरफोडी केल्यानंतर पोलिसांना कुठलाही धागादोरा मिळू नये म्हणून ही टोळी विशेष काळजी घ्यायची...मात्र पुण्यातील घरफोड्यांचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 3 हजार सीसीटीव्ही तपासले आणि त्यात घरफोडीचे धागेदोरे मिळाले. त्यातूनच गणेश काठेवाडे, सुरेश पवार यांच्या मुसक्या आवळल्या. एवढंच नाही तर सोने विक्री करणारा व्यावसायिक अजय राजपूत यालाही पोलिसांनी जेरबंद केलंय.

Pune Crime
Crime : पुण्याच्या लखोबा लोखंडेला बेड्या, लग्नाचे आमिषाने २५ विधवांना फसवले, शरीरसंबंधही ठेवले

त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलायला लागले. पुण्यात झालेल्या घरफोड्यांमधून पोलिसांनी तब्बल 86 तोळे सोन्यांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय.. यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत? पाहूयात.

आरोपी जेरबंद, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

सोन्याचे दागिने- 86 तोळे

हिरे- 150

चांदीचे दागिने- 3.5 किलो

दुचाकी वाहन- 1

पिस्तुल- 2

जिवंत काडतुसं- 5

घरफोडीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रं

Pune Crime
Pune News : पैसे मिळाले नाहीत, चोरांनी लॉलीपॉपवर मारला ताव, घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी मुसक्या आवळलेला आरोपी गणेश काठेवाडे हा मकोका गुन्ह्यातून जामिनावर सुटलाय...त्याच्यावर पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागात तब्बल 55 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय.. त्यामुळे हे तीन आरोपीच नाही या प्रकरणातील इतरांचा सहभाग शोधून त्यांच्याही मुसक्या आवळायचं आव्हान पोलिसांसमोर आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com