Pune News : पैसे मिळाले नाहीत, चोरांनी लॉलीपॉपवर मारला ताव, घटना सीसीटीव्हीत कैद

Bhugaon Pune Crime News: चोरट्यांनी पुण्याच्या भुगाव परिसरातील एक बिर्याणीच्या दुकानात चोरी केली. यातील एक विचित्र चोरी म्हणजे बिर्याणी हाऊस मधील पैसे न चोरता त्यांनी चक्क लॉलीपॉप चोरुन नेले.
Pune News
Pune Newsgoogle
Published On

पुणे शहर आणि त्याच्या परिसरात घर फोडी आणि दुकान होळीचे प्रमाण वाढले आहे, आणि त्यात आता एक अजब चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी पुण्याच्या भुगाव परिसरातील एक बिर्याणी हाऊसच्या दुकानात चोरी केली. यातील एक विचित्र चोरी म्हणजे बिर्याणी हाऊस मधील लॉलीपॉप चोरी केली गेली.

निखाराशाही बिर्याणी या दुकानात लॉलीपॉप चोरी करून रस्सा टेस्ट केला . त्याचबरोबर दुकानात असणारी तीस रुपयाची चिल्लर ही चोरली व कोल्ड्रिंक्स चोरीत पळ काढला. अमोल सणस जो दुकानाचा मालक आहे त्याने या चोरीबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेच्या तपासासाठी पोलीस कर्मचारी सक्रिय आहेत.

Pune News
Mumbai Local Video : रेल्वे स्थानकावर रेलिंग ओलांडताना झाली फजिती, थेट डोक्यावर पडला, पाहा व्हायरल VIDEO

विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोर दुकानात प्रवेश करताना आणि चोरी करताना दिसत आहेत. चोरांनी कशा पद्धतीने दुकानात प्रवेश केला आणि चोरी केली याचे साक्षीदार सीसीटीव्ही फुटेज आहेत. पैसे मिळाले नाही म्हणून चोरांनी दुकानातून लॉलीपॉपच चोरले. या विचित्र चोरीच्या घटनेविषयी स्थानिकांची प्रतिक्रिया उमटत आहेत.

Pune News
Mahakumbh Mela 2025: प्लॅटफॉर्म बदलामुळे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, शेकडो प्रवासी जखमी, थरार कॅमेऱ्यात कैद

या प्रकाराच्या चोरीत चोर कोणतीही गोष्ट चोरी करत असताना, त्यांचे लक्ष लॉलीपॉप आणि चिल्लरवरही गेले, ज्यामुळे या चोरीला एक वेगळा वळण मिळाले आहे. पुण्यात चोरट्यांच्या अशा चोरींमुळे पोलिसांना जास्त सतर्क राहावे लागेल. पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहे आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Pune News
Sharad Pawar on Amit Shah: अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर, पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com