Pune Crime News : अनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र एक-दोन नव्हे, तर तब्बल २५ महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडे याला पुण्यातून अटक करण्यात आलेय. कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून पुण्याच्या लखोबा लोखंडेला अटक केली आहे. राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्कार एका महिलेने दिली होती. त्यानुसार, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं तपास केला. त्यांना पायामुळे पुण्यात सापडली. पुण्यात रविवारी लखोबा लोखंडेला बेड्या ठोकल्या. लग्नाचे आमिष दाखवून २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव फिरोज निजाम शेख असे आहे.
३२ वर्षीय फिरोज निजाम शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे वास्तव्यास आहे. तो मूळचा गंगावळण, इंदापूर येथील आहे. इंदापूरमध्येही फिरोज याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. फिरोजने लग्नाचे आमिष दाखवत २५ महिलांना फसवले. त्यांच्याकडून पैसे उकळल्याचेही तपासात उघड झालेय. त्याने महिलांसोबत शारीरिक संबंधही ठेवल्याचे तपासात समोर आलेय. पोलिसांकडून फिरोज याची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत फिरोज शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे समोर आले. काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळल्याचेही समोर आलेय.
कोल्हापूर येथील एका घटस्फोटित महिलेला फिरोज शेख याने जाळ्यात अडकवले. शादी डॉट कॉमवरून त्याला मोबाइल क्रमांक मिळाला. दोघांचे बोलणे वाढले, त्याने लग्न करण्याची आमिष दाखवले. इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे त्याने त्या महिलेच्या कुटुंबियांना सांगितले. ओळख वाढल्यानंतर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले. लग्नाचा विषय निघाल्यानंतर त्याने ब्रेन ट्यूमरचे कारण सांगत टाळा टाळ सुरू केली. त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने राजवाडा पोलीस फिर्याद दिली. कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली, त्या आरोपीचे लोकेशन पुण्यात असल्याचे समजले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी पुण्यातील कोंडवा येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी काय माहिती दिली?
सदर महिलेकडे सविस्तर चौकशी केली असता, सदर घटस्फोटित महिलेला एक लहान मुलगा असल्याने मुलाचे भवितव्य व आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा या विचाराने लग्न करण्याचे ठरवुन तिने तिची प्रोफाईल तयार करुन Shadi.Com या संकेत स्थळावर पाठविली होती. आरोपी फिरोज शेख रा. कॅम्प पुणे याने रिक्वेष्ट पाठवुन सदर महिलेचा मोबाईल नंबर घेवुन तो उच्चशिक्षित व इंडस्ट्रीयल कॉन्ट्रक्टर असल्याचे व त्याची ५ कंपन्यांची व्हेंडरशिप असल्याची खोटी माहिती दिली. फिरोज शेख हा सदर महिलेच्या घरी दखील आला व घरच्यानांही त्याने खोटी माहीती दिली. त्याने दिलेल्या माहितीवर महिलेचा विश्वास बसला व तिने लग्नास पसंती असल्याचे कळविले. दरम्यान फिरोज शेख याने सदर महिलेबरोबर वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करुन तिला लग्नाचे अमिष दाखवून व तिचा विश्वास संपादन करून तिला आपल्या जाळ्यात ओढून तिला शारिरीक संबध करणेस भाग पाडले. त्यानंतर त्याने त्याच्या वेगवेगळ्या अडचणी सांगण्यास सुरवात करुन, तिचेकडे पैशाची मागणी केली.
सदर आरोपीचे पुर्ण नाव फिरोज निजाम शेख, मुळ पत्ता गंगावळण, कळाशी, ता. इंदापुर, पुणे सध्या राहणार फलॅट क्र ६०२, बी विंग, आयडियल होम अपार्टमेंट, उस्मानिया मजीद जवळ, मिठानगर, कोंढवा, पुणे असा आहे. अधिक माहिती मध्ये आरोपीचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. नमुद आरोपीविरुदध अशाच प्रकारचे यापुर्वी इंदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेचे समजते. तसेच आरोपी याने यापुर्वी Shadi.Com च्या माध्यमातुन ओळख करुन २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणुक केल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.