सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी
Dhule-Surat Highway : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील 30-35 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. त्या मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह अशी दिसून आली. त्यावरून निर्दयतेने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. तोंडावर कापड, तर दोरीने बांधलेले हात-पाय, आशा स्थितीत काटेरी झुडपात मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, चार दिवसांपूर्वी हत्या करून टाकून दिला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
बेपत्ता तरुणाचे नाव सईद चिराग शाह अशल्याचे समजतये. हा वय 32 वर्षीय तरूण विसरवाडीया येथील असल्याचे फोटोवरून स्पष्ट झालेय. सईद शाह 8 जानेवारीपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. कोंडाईबारी घाटात चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच घाट परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. सईद शाह यांच्या कुटुंबीयांसाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, आरोपींना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा संपूर्ण जिल्हा व्यक्त करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.