pune killing over 100 rupees stone attack case Saam Tv
क्राईम

Pune News : १०० रुपये आणि २ मिनिटाचा राग, हत्या केली अन् आता पश्चातापाची वेळ; १० वर्षांनी आरोपीला शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?

Pune Crime News : आरोपीने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून १०० रुपये उसने घेतले होते. ते पैसे आरोपी परत करत नव्हता. पुढे यावरुन वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात त्याने हत्या केली. ही घटना २०१५ मध्ये घडली होती.

Yash Shirke

Pune Crime News : पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात एक प्रलंबित प्रकरणाची अंतिम सुनावण्यात आली. उसने पैसे परत न दिलेल्या आरोपीने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली होती. या हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. घटनेच्या तब्बल १० वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला आहे.

आरोपीचे नाव भीमराव यशवंत खांडे असे आहे. त्याने १७ एप्रिल २०१५ रोजी दुपारी बाराच्या सुमारास चंद्रकांत शंकर चव्हाण या व्यक्तीची हत्या केली होती. वडकी गावात असलेल्या एका गोदामाजवळ खांडेने खून केला होता. हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी भीमराव खांडेला अटक केली होती.

खांडे आणि चव्हाण यांचा परिचय होता. खांडेने चव्हाणकडून गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. चव्हाण उसने दिलेले १०० रुपये परत मागत होता. सतत पैसे मागत असल्याने त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. दरम्यान १७ एप्रिल रोजी त्यांचे भांडण वाढले. रागाच्या भरात खांडेने चव्हाणच्या डोक्यात दगड घातला. यात चंद्रकांत चव्हाणचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हाच्या आधी चव्हाणने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालिन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांनी तपासात मदत केली अशी माहिती समोर आली आहे. शुल्लक रकमेवरुन झालेल्या वादातून केलेल्या कृत्यामुळे आता आरोपीला शिक्षा भोगावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT