Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime : १० लाख दे नाहीतर गोळी खाण्याची ताकद ठेव! घायवळ टोळीचा "प्रतिस्पर्धी" संतोष धुमाळ वर मकोका दाखल

Pune Crime News : पुण्यातील कोथरूड भागात १० लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात घायवळ टोळीचा माजी सदस्य संतोष धुमाळवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. धुमाळ आणि निलेश घायवळ यांच्यातील वादातून गँगवॉरची शक्यता वर्तवली जात आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील संतोष धुमाळवर मोक्का दाखल करण्यात आला आहे

  • धुमाळ हा पूर्वी घायवळ टोळीचा सदस्य होता

  • आरोपींनी धुमाळला जीवे मारण्याचा प्लॅन केला होता, पण नजर चुकीने प्रकाश धुमाळवर गोळीबार झाला

  • पोलिसांनी संतोष धुमाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

एकेकाळी पुण्यातील घायवळ टोळीचा सदस्य असलेल्या संतोष धुमाळ वर आता पुणे पोलिसांनी मोक्का दाखल केला आहे. एका तरुणाकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात धुमाळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना ४ संप्टेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या शास्त्रीनगर मध्ये घडली. रोहित आखाडे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये आखाडे हा धुमाळ गँग सोबत होता. एका गुन्ह्यात आखाडे याला अटक करण्यात आली होती आणि त्यावेळी पोलिसांना त्याने धुमाळ बद्दल माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी रात्री १ वाजता आखाडे याला धुमाळ ने व्हिडिओ कॉल केला आणि "तु कोठे आहेस, मला भेटायला ये, तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे तु मला १० लाख रुपये दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव", अशी धमकी दिली. पण त्यावेळी आखाडेने तक्रार दिली नाही. ४ सप्टेंबर रोजी पुन्हा आखाडे याला धुमाळने फोन करत खंडणी मागितली. काही वेळात धुमाळ त्याच्या साथीदारांसह तिथे आला आणि दहशत माजवून निघून गेल्यानंतर आखाडेने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.याप्रकरणी आता कोथरूड पोलिस ठाण्यात संतोष आनंद धुमाळ, विपुल उत्तम माझिरे, सागर गवासने यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष धुमाळ घायवळ गँगच्या "टार्गेट" वर होता?

संतोष धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळ च्या टोळीचा सदस्य किंबहुना एकदम "खास" होता. कालांतराने धुमाळ आणि निलेश घायवळ चे वाद होऊ लागले आणि धुमाळ ने ती गँग सोडली. काही महिन्यांपूर्वी घायवळ आणि धुमाळ यांच्यात जमिनीच्या वादातून घुमश्चक्री झाली. यातून घायवळ गँग ने धुमाळ चा काटा काढण्याचं ठरवलं होतं. यासाठी कोथरूड प्रकरणातील आरोपींची निवड झाली. १७ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात घायवळ टोळीतील सदस्यांनी धुमाळचा वचपा काढण्याचं ठरवलं.

एका धुमाळवर "ट्रॅप" दुसऱ्या धुमाळवर गोळीबार

१७ सप्टेंबरच्या रात्री पाच जणांनी संतोष धुमाळ वर "ट्रॅप" लावला आणि प्लॅन बनवला पण प्लॅन पूर्वी चांदणी चौकात त्यांनी दारू प्यायली आणि नशेत कोथरूडच्या दिशेने येत असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का एका व्यक्तीला बसला आणि तो व्यक्ती म्हणजे प्रकाश धुमाळ. नशेत असल्यामुळे तरुणांना काही कळलं नाही आणि त्यांनी प्रकाश धुमाळ वर गोळीबार करत पुढे एका तरुणावर कोयत्याने वार केले. गोळीबारात धुमाळ हा व्यक्ती जखमी झाला पण जो धुमाळ या गँग च्या रडार वर होता तो हा धुमाळ नव्हता कारण गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव प्रकाश धुमाळ आणि टार्गेट वर असणारा संतोष धुमाळ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: दिवाळीला हिंदूच्या दुकानातूनच खरेदी करा, दादांच्या आमदाराचा धर्मांध नारा

Maharashtra Live News Update : - तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं- अमोल मिटकरी

Maharashtra Government: अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणी होणार, राज्य सरकारचा आणखी एक धडाडीचा निर्णय

बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन यांचा ८३वा वाढदिवस, चाहत्यांचा मोठा उत्साह|VIDEO

Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT