Pune Crime News  Saam TV
क्राईम

Pune Crime: खळबळजनक! वाघोलीजवळ बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवत १६ लाखांचे दागिने लंपास

Wagholi Crime: पुण्यात वाघोलीजवळ बिवरी या गावात चाकूचा धाक दाखवत घरावर दरोडा टाकण्यात घटना उघडकीस आली आहे. या दरोड्यात रोख रकमेसह १६ लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. २ एप्रिल २०२४

Pune Crime News:

पुण्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात वाघोलीजवळ बिवरी या गावात चाकूचा धाक दाखवत घरावर दरोडा टाकण्यात घटना उघडकीस आली आहे. या दरोड्यात रोख रकमेसह १६ लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. (Crime News in Marathi)

वाघोली (Wagholi) परिसरातील बिवरी येथील गोते यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री सात जणांच्या टोळक्याने दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सुमारे १६ लाख रुपयांचे दागिने व रोकड दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटून नेण्यात आले आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुबियांसमवेत घरात झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सात जणांनी गोते यांच्या घराचा दरवाजा कटावणीने उघडला. तसेच सात जणांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्वांंना चाकूचा धाक दाखविला. तसेच घराच्या कपाटातील पाच लाख रुपये रोकड व सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी लंपास केले.

दरम्यान, यावेळी कानातले दागिने काढताना ते दागिने ओढल्याने फिर्यादी यांच्या आईला कानाला दुखापतही झाली. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT