Pune Crime News Saam tv
क्राईम

Pune Crime News: बहिणीला पळवून नेल्याचा संशय, प्रेयसीच्या भावाने प्रियकराच्या वडिलांना संपवलं; पुण्यातील भयंकर घटना

Pune Crime News: बहिणीला घेऊन गेल्याचा संशय आणि राग धरत तरुणीच्या भावाने मुलाच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. २५ जून २०२४

बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून प्रेयसीच्या भावाने प्रियकरांच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. कटाळू कचरू लहाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून पुण्यातील येरवडा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिणीला घेऊन गेल्याचा संशय आणि राग धरत तरुणीच्या भावाने मुलाच्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. पुण्यातील येरवडा भागातील ही घटना असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मत कटाळू लहाडे व इस्माईल शेख कुटुंबीय एकाच परिसरात वास्तव्यास आहे. कटाळू यांचा मुलगा आणि इस्माईल याची बहिण या दोघांमध्ये मैत्री होती. आज सकाळी कटाळू यांचा मुलगा व संबंधित तरुणी घरातून निघून गेले. बहिणीला कटाळू याच्या मुलानेच पळवून नेल्याचा संशय इस्माईल याला आला.

त्या रागातून कटाळू याच्यावर इस्माईल याने धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपी इस्माईल शेख यास ताब्यात घेतले आहे. एकीकडे ड्रग्ज प्रकरणाने पुण्यात वातावरण तापले असतानाच या भयंकर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

Maharashtra Live News Update: नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

SCROLL FOR NEXT