Pune News Saam TV
क्राईम

Pune News: तुमच्या मुलाचा अन् पतीचा मृत्यू होईल...; पुण्यात जादूटोण्याचा भयंकर प्रकार उघड

Pune: मुलाची आजारातून मुक्तता करण्यासाठी विश्वास संपादन करून चार जणांनी अघोरी विद्येचा बनाव केला आहे. सदर घटनेत ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune Crime News:

पुण्यातील चंदन नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलाला मानसिक आजारातून बरं करण्यासाठी त्यावर जादूटोणा करण्यात आलाय. घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी व मुलाची आजारातून मुक्तता करण्यासाठी विश्वास संपादन करून चार जणांनी अघोरी विद्येचा बनाव केला आहे. सदर घटनेत ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वैशाली गायकवाड या महिलेकडून ५ जणांच्या टोळक्याने तब्बल ३५ लाख रुपये उकळलेत. महिलेच्या घरातील अडचणींवर तोडगा काढणार असं सांगत त्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर ५० लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या नाहीतर तुमच्या घराचा नायनाट होईल, अशी धमकी त्यांनी महिलेला दिली.

नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पैशांसाठी पुढे महिलेचा मुलगा आणि पतीची हत्या करू असंही म्हटलं. तसेच महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. अघोरी विद्या करून जादूटोणा आणि मंत्राच्या साह्याने या ५ जणांनी आतापर्यंत ३५ लाख रुपये उकळलेत.

चारुदत्त मारणे असं यातील मुख्य आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केलाय. नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. चंदन नगर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Horoscope: काही राशींना लागेल लॉटरी तर काहींची होईल खटपट; जाणून घ्या कसा असेल शुक्रवारचा दिवस

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT