Burglary In Pune Bibwewadi: Saam Tv
क्राईम

Pune Crime: आईच्या ऑपरेशनसाठी फोडलं शेजाऱ्याचं घर; पळवले लाखो रुपयांचे दागिने

Burglary In Pune Bibwewadi: शेजारी गावाला गेल्याच फायदा घेत एका व्यक्ती लाखो रुपयांचे दागिने पळवले आहेत. बिबेवाडी पोलिसांनी चोराला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दागिने जप्त केली आहेत.

Bharat Jadhav

(सागर आव्हाड)

Pune Crime Burglary In Bibwewadi : पुणे : पैशांची चणचण असल्याने आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका व्यक्तीने शेजाऱ्याचं घर फोडलं. घर फोडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड पैसे लंपास केलेत. ही घटना बिबवेवाडीत घडली असून पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावत चोराला बेड्या ठोकल्यात.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव दिपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे आहे. आरोपी बिबवेवाडीतील बहुमजली सोसायटीत सहाव्या मजल्यावर राहत होता. दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात त्याच्या शेजारी राहणारे एक कुटूंब त्यांच्या मुळगावी गेले होते. ही संधी साधत आरोपीने हॉलच्या बाल्कनीच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.

या चोरी प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी याचा तपास सुरू केला. या तपासात चोरी करणारा चोरटा त्या शेजारीच निघाल्याने पोलीस आवाक झालेत. आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून दिपकने शेजाऱ्याचं घर फोडत रोकड लंपास केली.

पुणे शहरात भुरट्या चोर्‍या वाढल्या

मांजरी खुर्द येथे कोलवडी मांजरी रोडवर असणाऱ्या द्वारका मेडिकल दत्त क्लिनिकचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली. क्लिनिकमध्ये चोरांना काहीही हाती लागले नसल्याने चोरांनी मेडिकलमधील कॅडबरी चॉकलेट, डल्ला मारला. या दोन्ही दुकानात सीसीटिव्ही CCTV कॅमेरे आहेत. या सीसीटिव्ही मध्ये तीन इसम येताना दिसत आहे. तिघांनी ही जर्किंग घातले आहे, तोंडाला रुमाल बांधलेला आहे, प्रथम दोघांनी कटावणीच्या साहाय्याने शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला.

चोरी करताना बघितलं म्हणून तरूणानं महिलेला संपवलं

पुण्यामध्ये एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी करताना पाहिले म्हणून आरोपीने महिलेची हत्या केली. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसरमधील मांजरीफार्म परिसरात ही घटना घडली आहे. चोरी करताना बघितले म्हणून आरोपीने 50 वर्षांच्या महिलेची निर्घृण हत्या केली. राजेश मुळेकर असं आरोपींचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT