Hinjewadi Crime News Crime News Saam TV
क्राईम

Pune Crime: हिंजवडीत इंजिनियर तरुणीची गोळ्या झाडून हत्या, लॉजमध्ये आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

गोपाल मोटघरे

Pune Crime News:

पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका साॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदना द्विवेदी असे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ऋषभ निगम असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव असून हे दोघेही लखनौचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंजवडी (Hinjewadi) पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी (वय, २६) असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम याच्यासोबत वास्तव्यास होती.

आज सकाळी ऋषभ निगम याने वंदनाची बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. हा हत्येनंतर तो लखनौला जाण्यासाठी पळून गेला, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत ताब्यात घेतले. तसेच हत्येत वापरण्यात आलेली पिस्टलही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भयंकर गुन्ह्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol Death) याची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली असून जुन्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT