Friend who died while stealing wires  Saam tv
क्राईम

Pune News: चोरीसाठी गेला अन् घात झाला; मित्रांनी डोंगरात पुरला, २० दिवसांनी उकललं गूढ

Friend who died while stealing wires was buried by two other friends : पुण्यामध्ये तारा चोरी करण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा मृ्त्यू झाल्याची घटना समोर आलीय. त्याच्या साथीदारांनी घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला होता.

Rohini Gudaghe

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये चोरी करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. त्यानंतर त्याच्या मित्रांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत सविस्तर वृत्त असं की, पुण्याच्या राजगड तालुक्यात टॉवरवर चढून तारांची चोरी करताना एक तरूण मृत्युमुखी पडला. इतर दोघामित्रांनी त्याचठिकाणी त्याला पुरल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

राजगड तालुक्यातील धक्कादायक घटना

राजगड तालुक्यातील (Rajgad taluka) दुर्गम डोंगरी पाबे परिसरामध्ये तीन मित्र विजेच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकाचा मृत्यू झाला. तेव्हा इतर दोघांनी त्याला तिथेच डोंगरी भागात पुरले अन् घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना (Pune Crime News) घडली. या घटनेमुळे राजगड तालुक्यात मोठी खळबळ उडालीय. बसवराज पुरंत मॉगनमनी, असं मृत तरुणाचं नाव आहे.

चोरी करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू

बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलैला सिंहगडरोड पोलीस ठाण्यात दाखल दिली होती. बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या तरूणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास केल्यानंतर तब्बल २० दिवसांनी हा धक्कादायक प्रकार समोर आला (Crime News) समोर. याप्रकरणी बसवराजचे साथीदार आरोपी रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.

साथीदारांनी काढला घटनास्थळावरून पळ...

सिंहगड आणि वेल्हे पोलीस एकत्रितरित्या घटनेचा तपास करत आहेत. राजगड तालुक्यातून ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मृत्यूच्या २० दिवसानंतर या तरूणाच्या बेपत्ता असण्याचं गूढ उककलं (died while stealing) आहे. साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला होता, त्यांनी मृत तरूणाच्या पालकांना याबाबत काहीही कल्पना दिलेली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT