Crime News  Saam TV
क्राईम

Pune Crime: बर्थडे सेलिब्रेशनवरुन वाद, पुण्यात हॉटेलमध्ये राडा; १५ ते २० जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण

Pune News: मुलीच्या पायाला लागल्याने तिच्या वडिलांनी हॉटेल चालकांना यासंबंधी जाब विचारला. यावरुनच दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेबाबत डेक्कन स्टेशनकडे दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १० फेब्रुवारी २०२४

Pune Crime News:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार, मारहाणीच्या गंभीर घटना वारंवार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील (Pune) डेक्कन परिसरातील क्रेझी सिझलर हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी १५ ते २० जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये एक कुटुंब मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र या ठिकाणी सेलिब्रेशनला फक्त मुलगी आणि आई अश्या दोघांनाच परवानगी होती. या दरम्यान मुलीच्या पायाला लागल्याने तिच्या वडिलांनी हॉटेल चालकांना यासंबंधी जाब विचारला. यावरुनच दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेबाबत डेक्कन स्टेशनकडे दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली नाही.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचे नवे पोलिसायुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली होती. यावेळी या गुंडांना छोटे, मोठे गुन्हे करायचे नाहीत, सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स शेअर करायचे नाहीत, असा सज्जड दम दिला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT