Nikhil Wagle Car Attack: निखिल वागळेंच्या कारवर हल्ला करणं भोवलं; भाजपच्या 10 पदाधिकाऱ्यांवर पुणे पोलिसांत गुन्हा

Nikhil Wagle Latest News: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय
BJP workers Attack on Nikhil Wagle Car
BJP workers Attack on Nikhil Wagle Car Saam TV
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

BJP workers Attack on Nikhil Wagle Car

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 10 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणाची सखल चौकशी केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP workers Attack on Nikhil Wagle Car
Breaking News: अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय

गेली ४५ वर्ष आपल्या निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व्यवस्थेला सडेतोड सवाल करीत आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवरून वागळे सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते.  (Latest Marathi News)

याचवेळी डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लक्ष केले. निखिल वागळे यांची कार पोलीस सुरक्षेत असतानाही काही भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. इतकंच नाही, तर काहींनी त्यांच्या कारवर अंडी फेकत काचा देखील फोडल्या.

भाजप कार्यकर्त्यांनी जेव्हा हल्ला केला, तेव्हा निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे हे गाडीतच होते. या संपूर्ण प्रकारानंतर पुण्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केलं होतं.

अखेर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

BJP workers Attack on Nikhil Wagle Car
ED Action on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; ईडीने केला मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com