Pune-Nashik Expressway: नाशिककरांसाठी खुशखबर! अवघ्या ३ तासांत गाठता येणार पुणे; प्रकल्पाला शासनाची मंजूरी

Pune to Nashik In Just 3 Hours: नागरिकांना आता अवघ्या ३ तासांत नाशिक ते पुण्यापर्यंतचं अंतर पार करता येणार आहे. यासाठी पुणे-नाशिक एक्स्प्रेसच्या कामाला शासनाकडून अंतिम मंजूरी मिळाली आहे.
Pune-Nashik Expressway
Pune-Nashik ExpresswaySaam TV
Published On

Pune Nashik Expressway News:

नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी साधारण ५ तासांचा प्रवास करावा लागतो. आता नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नागरिकांना आता अवघ्या ३ तासांत नाशिक ते पुण्यापर्यंतचं अंतर पार करता येणार आहे. यासाठी पुणे-नाशिक एक्स्प्रेसच्या कामाला शासनाकडून अंतिम मंजूरी मिळाली आहे.

Pune-Nashik Expressway
Nashik Crime: बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने वाद, बालपणीच्या जिवलग मित्राकडून मित्राची हत्या; नाशिकमध्ये खळबळ

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग एकून २१३ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग असून यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) राज्यभरात 4,217 किमी लांबीचे महामार्ग नेटवर्क तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे-नाशिक एक्स्प्रेस वे हा त्यातीलच एक भाग आहे.

पुणे-नाशिक एक्स्प्रेस वेसाठी 20,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे दोन जिल्ह्यांमधील कनेक्टीवीटी सुधारनार आहे. त्यासह पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला लक्षणीय चालना मिळणार आहे.

प्रवास सुरळीत आणि सुखरुप व्हावा यासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळ्या विभागात विभाजन केले जाणार आहे. यात पहिला विभाग पुणे ते शिर्डीपर्यंत असून इथपर्यंत 135 किमी अंतर कापले जाईल. दुसऱ्या विभागात, सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेचा एक भाग आहे, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंजपर्यंत 60 किमी अंतर कापेल. तयार होणारा नवा महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर आणि शिर्डी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या अनेक शहरांमधून जाण्याची शक्यता आहे.

Pune-Nashik Expressway
Sambhajinagar Crime: विद्यापीठातूनच तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरडाओरड केल्याने आरोपी फरार, संभाजीनगरमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com