क्राईम

Pune Crime: धक्कादायक! रेनकोटवरून भांडण, सपासप चाकूने वार; डिलिव्हरी बॉयने मित्राला संपवलं

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये रेनकोटवरून झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालंय. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पुण्यातील सिंहगड रोड भागात मोठी खळबळ उडाली होती.

रेनकोटवरून भांडण झालं

या घटनेत आदित्य वाघमारे, असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव (Pune Crime News) आहे. सुरेश भिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे ही मित्र होते. दोघेही सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करायचे आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. दोघंही मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांसोबत त्यांची ओळख झाली होती.

डिलिव्हरी बॉयने केला मित्राचा खून

काल २५ ऑगस्ट रोजी दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला (Crime News) होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री साडे दहा वाजता ते दोघेही भेटले. मात्र, वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात अजून भांडण वाढलं (Killed Friend) होतं. दरम्यान, भिलारेने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

सिंहगड परिसरातील घटना

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू (Delivery Boy Killed Friend) आहे. केवळ एका रेनकोटवरून मित्राने मित्रालाच संपवल्याची घटना पुण्यातून समोर आलीय. या घटनेमुळे मात्र पुणं चांगलंच हादरलं आहे. मागील काही दिवसांत पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वर गेलाय. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलंय. पुणे पोलीस गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु अशा घटनांमुळे पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT