Chicken Shopkeeper Stabbed In kondhwa Pune  Saam Tv
क्राईम

Pune Crime News : पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही म्हणून तो चिडला, दुकानदारासोबत भयंकर कृत्य

Kondhwa Crime News : पुण्यात चिकन दुकानदाराला चाकूने भोकसल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chicken Shopkeeper Attacked In Pune :

आजकाल खाण्यापिण्यावरून दुकानदारांसोबत होणारा राडा, मारहाण या गोष्टी काही नवीन नाही. दिवसेंदिवस या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुणे शहराचा नंबर लागतो. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता पुन्हा पुण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पार्टी साजरी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून चिकन दुकानदाराला चाकूने भोकसल्याची घटना घडली आहे. सुफियान आयुब शेख असं मारहाण करत दुकानदारास चाकूने भोकसणाऱ्या आरोपीचं नाव आहे. (latest crime news)

नेमकं काय घडलं ?

चिकन व्यावसायिक अब्दुला शेख यांचं पुण्यात कोंढव्यातील मिठानगर परिसरात गल्ली क्रमांक चार या ठिकाणी चिकनचं दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे रात्री अकराच्या सुमारास चिकन दुकान बंद करून घरी जात होते.

त्यावेळी आरोपी त्यांच्या दुकानात पोहोचला. ते घरी जात असताना आम्हाला पार्टी करण्यासाठी चिकन पाहिजे, म्हणून त्यांच्याशी वाद घालू लागला.

दुकानदाराला चाकूनं भोकसलं

दुकान बंद आहे. तुम्हाला चिकन मिळणार नाही, असं दुकानदार अब्दुला शेख यांनी आरोपी सुफियान आयुब शेख याला सांगितलं. पण असं सांगताच आरोपीने दुकानदार अब्दुला शेख यांच्यावर हल्ला केला. त्यांना चाकूनं भोकसून जखमी केलं.

या प्रकरणी आरोपी सुफियान शेख याच्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सत्तेचा माज आलाय, हा व्हायरस तुम्ही पसरू देताय; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक पत्र

India Terror List: पाकिस्तानातील 23 दहशतवाद्यांवर भारताची सर्वात कारवाई, गृह मंत्रालयाच्या निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरात जोरदार पावसामुळे कात्रप भागातील रस्ता पाण्याखाली

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल; मेसेज वाचून अंगावर येईल काटा

HSRP Number Plate: महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट नाही? आजपासून थेट ₹1,000 दंड; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT