Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime News: बहिणीची छेड काढली म्हणून भाऊ खवळला,केली एका सराईत गुन्हेगाराची हत्या

Brother Killed Criminal : बहिणीची छेड काढली, म्हणून भावाने एका सराईत गुन्हेगाराचा खून केलाय. ही घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Brother Killed Criminal In Pune

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. रोज हाणामारी, चोरी, दरोडा किंवा खूनाच्या नवीन घटना समोर येत आहे. काही दिवसांपू्र्वीच पुण्यात गुंड शरद मोहोळ याच हत्याकांड झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. नक्की काय घडलं, खून का झाला हे आपण सविस्तर जाणून घेवू या.  (latest marathi crime news)

भाऊ बहिणीच्या नातं हे अतिशय प्रेमळ असतं. आपल्या बहिणीवरील प्रेमापोटी भावाने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. आपल्या बहिणीची छेड काढल्याचं, तिला त्रास दिल्याचं कोणत्याच भावाला आवडत नाही. अशीच एक घटना पुण्यात देखील घडली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हेगाराने काढली बहिणीची छेड

बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना लष्कर परिसरात घडली आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटना शनिवारी घडली

आरोपींनी अरबाजवर धारदार शस्त्राने वार करून खून केलाय. ही घटना शनिवारी पहाटे लष्कर परिसरात ताबूत स्ट्रीटजवळ घडली होती. अरबाजविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाई केली होती. वर्षभरानंतर तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता.

नक्की काय घडलं होतं

एका तरुणीची छेड काढली होती. त्यामुळे आरोपींनी अरबाजच्या खुनाचा कट रचला. आरोपींनी त्याला शनिवारी मध्यरात्री ताबूत स्ट्रीट परिसरात बोलावून घेतलं. त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपींनी अरबाजवर शस्त्राने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अरबाजचा मृत्यू झालाय.

खूनाचा कट रचला

बहिणीची छेडछाड केली म्हणूनच अरबाजचा खूनाचा कट रचला गेला, हे आता स्पष्ट झालंय. अरबाज हा सराईत गुन्हेगार होता. तो नेहमीच लोकांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील पैसे काढून घेत असे. विक्रेत्यांच्या वस्तू उचलून घेऊन जात होता. त्याच्या त्रासाला सर्वजण कंटाळले होते. दिवसेंदिवस त्याची दणगटशाही वाढत चालली होती. लोकांना तो आई बहिणीवरुन शिवीगाळ देखील करत असे. गेल्या वर्षापासून तो तुरुंगातच होता. पण, आता बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचे जुने कारनामे सुरू झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT