Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Crime News Pune: पुण्यात दिवसा खासगी बँकेत काम करणारा आणि रात्री मोबाईलवर ऑनलाइन मटका जुगार चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • बँक कर्मचारी राहुल दिलीपसिंग परदेशी याला अवैद्य जुगाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

  • राहुल दिवसा नोकरी करायचा आणि रात्री ऑनलाइन मटका जुगाराचा व्यवसाय करत होता.

  • राहुलसह ३९ जण या प्रकरणात अडकले आहेत.

  • पुण्यातील घोरपडी पेठेत पोलिसांची धडक कारवाई.

अक्षय बडवे, पुणे

विद्येचं माहेर घर असणाऱ्या पुण्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. असे असलं तरी या चोरांचा चोरी करण्याचा दर्जा बदलला आहे असं म्हणावं लागेल. कारण पुण्यातील एक तरुण चक्क दिवसभर खासगी बँकेत काम करत होता आणि रात्री मटका रॅकेट चालवत होता. मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने मटका जुगार चालवीत असलेल्या या तरुणाला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल दिलीपसिंग परदेशी असं या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिलीपसिंग परदेशी हा पुण्यातील एका खासगी बँकेत कार्यरत होता. राहुल हा दिवस बँकेत काम करून रात्री पुण्यातील घोरपडी पेठ भागात असलेल्या जलतरण तलावाच्या जवळ उभा राहून मोबाईलवर पैसे स्वीकारून ऑनलाईन मटका जुगार चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं. रात्रीच्या सुमारास राहुल मोबाईलवर ऑनलाईन पैसे स्वीकारून मटक्याच्या जुगाराचे आकड्याचे बुकिंग घेताना पोलिसांच्या तावडीत सापडला. तसेच 39 मोबाईल क्रमांक धारक हे ऑनलाईन मटका जुगार खेळताना आढळले.

या ३९ जणांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हा मोबाईल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, बँकेमध्ये नोकरी करणारा तरुण ऑनलाईन मटका जुगार चालवत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपींना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Drinks: डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवायचाय? आजपासून डाएटमध्ये आवर्जून प्या 'हे' ३ हेल्दी ज्यूस

Pune: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पुणे मेट्रो ५०८ मीटर लांबीचा फुट ओव्हर ब्रिज उभारणार

Homemade Face Pack : काळे डाग, पिंपल्स आठवड्याभरात होतील छुमंतर; चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक

Maharashtra Live News Update: पनवेल मधील सेक्टर ४ मध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

Barshi : बार्शीतील व्यापाऱ्याची प्रामाणिकता; ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं चार तोळे सोनं केलं परत

SCROLL FOR NEXT