Pune Crime News  Saam Digital
क्राईम

Pune Crime News: पुण्यातील बुधवार पेठेत तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न; पिस्तूल रोखली पण गोळी न उडाल्याने अनर्थ टळला, एकाला अटक

Pune Breaking News: पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असतानाच शहरातील बुधवार पेठ परिसरात गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २५ जून २०२४

पुणे शहरातील गुन्हेगारी घटना काही कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असतानाच शहरातील बुधवार पेठ परिसरात गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली आहे.

शहरातील बुधवार पेठेतील सावतामाळी भवन परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने पिस्तुलातून गोळी न उडाल्याने तरुण बचावला. रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विजय केशवराव घुमारे (वय ५०, रा. सरस्वती हाईट्‌स, गणेश रस्ता, बुधवार पेठ) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झालेला तरुण प्रसाद भोसले हा बाऊन्सर म्हणून काम करतो. तर विजय घुमारे हा ठेकेदार आहे. आरोपी घुमारे व भोसले यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याचा राग घुमरे याच्या मनात होता. त्यातूनच रविवारी बुधवार पेठेतील सावतामाळी भवन परिसरात भोसले व घुमारे हे दोघे समोरासमोर आले. तेव्हा, त्यांच्यात शिवीगाळ झाली.

यावेळी घुमारे याने भोसले यांच्यावर पिस्तूल रोखले. घुमारेने पिस्तुलाचा चाप ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी न उडाल्याने भोसले थोडक्‍यात बचावले. या घटनेनंतर भोसले याने फरासखाना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घुमारे यास अटक करून त्याच्या ताब्यातील देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT