Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: मैत्रीत घात! दोघेही एकत्र राहायचे, मित्राच्या डोक्यात सनकी गेली; तरुणीला संपवलं

Pune Police: पुण्यात भयंकर घटना घडली आहे. तरुणाने आपल्या मैत्रिणीची गळा दाबून हत्या केली. हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये तरुणाने मैत्रिणीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये ही घटना घडली. मैत्रिणीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुण स्वत: पोलिस ठाण्यात हजर राहिला आणि त्याने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर भागात तरुणाने मैत्रिणीची हत्या केली. आरोपीने मैत्रिणीची गळा दाबून हत्या केली. नंतर तो स्वतःच पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. अनिता लोंढे २७ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिताचा मित्र राहुल शिवाजी मिसाळने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंडलकरनगर शेवळवाडी येथे हत्येची घटना घडली. अनिता आणि आरोपी राहुल हे मित्र मैत्रीण असून एकत्र राहत होते. आरोपीने त्याची मैत्रीण अनिताची गळा दाबून हत्या केली. आरोपी हा स्वतः यवत पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Diwali Car Care Tips: एक ठिणगी होत्याचं नव्हतं करू शकते, यंदाच्या दिवाळीत गाडीची अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT