Policeman Brutally Beaten Saam Tv
क्राईम

Pune Crime: पुण्यात गुंडाराज; रिक्षात डांबून पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Policeman Brutally Beaten: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. तसेच त्यांच्या आणखी एका साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनी सेनापती बापट रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील गुंडगिरी अजून कमी होताना दिसत नाहीये. शहरातील पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चार दारुड्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान पोलीस कर्चमारीच सुरक्षित नाहीत तेथे सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार याबाबाबत प्रश्न केला जात आहे.

कोम्बींग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षात डांबून मारहाण केल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत जाधव (वय.42,रा.रामोशीवाडी) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाणीनंतर चंद्रकांत जाधव चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार नोंदवलीय.

दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना झाल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. ते रामोशीवाडी एस.बी.रोड परिसरात ते वास्तव्यास आहेत. गुरुवारी मध्यरात्री आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते.

रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्यप्राशन करताना दिसले. जाधव यांनी वाद घालणाऱ्या चौघांना हटकले आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्याचा त्यांना राग आला. चौघांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस त्यामुळे तू आम्हाला शिकवू नको, असे म्हणत दम भरला. त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

आरोपींनी जाधव यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला.सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT