Pune Breaking News Theft in Mulshi Taluka seven and a half lakh Stolen from the house Saam Digital
क्राईम

Mulshi Crime: मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, तब्बल साडे ७ लाखांचा ऐवज लंपास; मुळशीत खळबळ

Mulshi Crime News: शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिलीप कांबळे

Mulshi Crime News:

मुळशीच्या कोळवण येथील एका घरात चोरी करुन तब्बल साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख रकम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुळशीच्या (Mulshi) कोळवन येथील शेतकरी किशोर दत्तोबा जाधव यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी जबरी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये घरातील सुमारे नऊ तोळे सोन्याचे पाच लाख त्र्यान्नव हजार रुपये किंमतीचे दागिने व घरातील एक लाख त्र्याहत्तर रुपयांची रोकड असे एकूण सात लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

किशोर जाधव यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी हे दागिने व रकमेची तरतूद केली होती.चोरट्यांनी तेच धन चोरी केल्याने आता मुलाचे लग्न कसे करायचे हा प्रश्न जाधव यांना पडला आहे.कोळवण परीसरात मागील काही वर्षांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

कोळवण येथे बीट स्तरीय पोलीस चौकी असून ती कायम बंदच आहे .ही पोलीस चौकी चालू करा म्हणून विविध सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. दरम्यान पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांनी एक टीम तयार करून लवकरात लवकर चोरांचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT