Mulshi Dam : मुळशीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; मुळशी धरण परिसरातील भागाला अतिरिक्त पाणी मिळणार,कारण?

Mulshi dam News : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ व २ च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
Mulshi Dam
Mulshi DamSaam tv

Ajit Pawar News :

मुळशीकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. 'मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह आजूबाजूच्या भागात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी. तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ व २ च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन मधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी मुळशीकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला महत्वाचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविणे गरजेचे आहे. यामुळे अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होईल. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामांस प्राधान्य देण्यात यावे'.

'हिंजवडीसह कोळवण खोऱ्यातील गावांमध्ये येत्या 3 वर्षात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात यावी. त्याचबरोबरउंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील आहे. यामुळे ही जमीन विनामोबदला देण्याची विनंती करण्यात यावी. उरलेली वीस टक्के जमीन ही शासनाच्या वतीने अधिग्रहण करावी. यासाठी जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावा, असे निर्देशही अजित पवार यांनी सांगितले.

Mulshi Dam
Maratha Reservation News : सरकारच्या जल्लोषात Ajit Pawar अनुपस्थित | Marathi News

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर कामांबाबत टाटा पॉवर कंपनीने हरकत घेतल्याने काम थांबले होते. तसेच कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा. जलसंपदा विभागाने आवश्यक पाण्याचे आरक्षण जाहीर करून याबाबत टाटा पॉवर कंपनीला देखील लेखी कळवावे, असे अजित पवारांनी पुढे सांगितले.

Mulshi Dam
CM Eknath Shinde | कोर्टात आरक्षण टिकेल की नाही याबाबत शंका नको- एकनाथ शिंदे | Marathi News

तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी ‘पीएमआरडीए’ने एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी ४ एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 'पीएमआरडीए'ने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com