Sanjay Raut: सुप्रीम कोर्टात अन् जनतेच्या न्यायालयात आमचाच विजय होईल; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Shivsena Mla Disqualification case: खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे गट तसेच भाजपवर जोरदार टीका केली.
Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group
Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde GroupSaam TV
Published On

Sanjay Raut on Shivsena Mla Disqualification case

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आमच्या निकालपत्रात जे निर्देश दिले होते, त्याच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला आहे का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (ता. ७) शिंदे गटाच्या वकिलांना केला. इतकंच नाही, तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे मूळ कागदपत्र आमच्यासमोर सादर करा, असे निर्देश कोर्टाने दिले. हा ठाकरे गटाला मोठा दिलासा मानला जात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group
Mahayuti News : 'ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डेड', असा तो फॉर्म्युला; विजय वडेट्टीवार यांचा जागावाटपावरुन महायुतीवर निशाणा

यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवायला हवं होतं. पण, त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं, असं संजय राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

विधीमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना शिंदे गटाचीच असा निर्णय देऊन राहुल नार्वेकर यांनी स्वत:चे हास्य करून घेतले. अशी टीकाही राऊत यांनी केली. विधिमंडळाच्या बहुतामताच्या आधावर पक्ष कोणाचा आहे, हे ठरत नाही. पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचे आहे, यावरून ठरतो, असंही राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी धाराशिव येथेपत्रकारपरिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदे गट तसेच भाजपवर जोरदार टीका केली. लवादाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण, त्यांच्यावर दबाव होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

"विधानसभा अध्यक्षांनी स्वत: अनेक पक्ष बदलले असून आता ते भाजपमध्ये जाऊन विधानसभा अध्यक्ष बनले आहेत. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावरून दिसतंय. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे. पण शिंदे गटाचे वकील वेळकाढूपणा करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे".

"खरं म्हणजे सुनावणी संपली असून फक्त निकाल द्यायचा आहे. असं असताना नवीन मुद्दे आणायची गरज नाही. शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी बनावट कागदपत्रे आणली. ती कागदपत्रे कोणती? शिवसेना बनावट आहे का? बाळासाहेब ठाकरे बनावट होते का?", असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

"मुळात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाही, हाच या लोकांचा बनावटपणा आहे. पण आम्ही आमची लढाई सर्वोच्च न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात सुरू आहे. शेवटी विजय आमचाच होईल", असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group
Lok Sabha Election 2024: काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर; राहुल गांधी कुठून निवडणूक लढवणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com