Social Media Influencer Missing Saam Tv
क्राईम

Pune Breaking: मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली पुण्यातील ‘इन्ल्फूएन्सर’ बेपत्ता; घरात सापडलेली चिठ्ठी वाचून आईला बसला धक्का

Social Media Influencer Missing: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर १.३ मिलियन फॉलोअर्स एक इन्ल्फूएन्सर बेपत्ता झाली आहे.

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

इन्स्टाग्रामवर तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स असलेली एक सोशल मीडिया ‘इन्ल्फूएन्सर’ १५ जूनपासून घरामधून निघून गेली आहे. घरामध्ये कोणालाही काहीही न सांगता ती निघून गेली आहे. मात्र तिने घराबाहेर पडण्यापूर्वी तिने लिहिलेली सुसा मात्र सापडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मयूरी चैतन्य मोडक-पवार (वय २६, रा. सदाशिव पेठ पुणे) असं सध्या बेपत्ता असलेल्या तरुणीचं नाव (Pune Breaking News) आहे. मयूरी पवार सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मिडियावर मयुरी ‘माऊ’ नावाने प्रसिद्ध आहे. मयुरीचे वडिल नसून ती आईसोबत राहते. तिने तिच्या सोशल मीडिया करिअरची सुरुवात ‘टिक टॉक’वरुन सुरू केली होती.

‘टिक टॉक’वर मयुरीला प्रचंड लोकप्रियता (Social Media Influencer Missing) मिळाली होती. तिचे लाखो फॉलोअर्स तयार झाले होते. मात्र, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातली. त्यानंतर, ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने संस्था स्थापन केलेली असून याद्वारे ती कपड्यांचा व्यवसाय (crime news) करते. मयुरीच्या अशा अचानक बेपत्ता होण्यामुळे तिच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मयूरी ही १५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरामध्ये कोणाला काहीही न सांगता निघून गेली. ती अद्याप परत आलेली (Pune News) नाही. याप्रकरणी मंगल दिलीप पवार (वय ४०) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत. पोलीस मयुरीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Fasting Food : उपवासाला बनवा 'ही' खास स्मूदी, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Kitchen Hacks: घरगुती आले-लसूण पेस्ट ६ महिने ताजी ठेवायची? जाणून घ्या सोपी आणि स्मार्ट ट्रिक्स

आई-बाबा माफ करा! 'नीट'ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या, नागपूरमध्ये खळबळ

Horoscope Today : विनाकरण कटकटी मागे लागतील, अफवा उठतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT