Pune Porsche Car Accident Latest Update Saam Tv
क्राईम

Pune Porsche Car Accident : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी २ जणांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

Porsche Car Accident Update : अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. मुंबईतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे, पुणे

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समजलीये. अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. मुंबईतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ससूनमध्ये रक्ताचे नमुने बदलण्यात या आरोपींचा हाथ होता, अशी माहिती पोलीस तपासात समजली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी २ आरोपींची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात झालेल्या अपघातानंतर तपासात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. ते तपासण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, रक्त्याच्या नमुन्यात फेरफार झाले.

फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ही संशियत आरोपी होती. शिवानीने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कट रचल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करत शिवानी अग्रवालला देखील ताब्यात घेतलं.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाच्या रक्ताच्या नमुन्या ऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुली शिवानीने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर याप्रकरणात आता पुन्हा अन्य दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT