अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत असताना पुण्यातूनही संतपाजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीला दारू पाजून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ मित्रांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी अत्याचार करणारे अल्पवयीन तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने २ मित्रांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन तरुणीला मैत्रिणीनेच दारू पाजल्याची बाब समोर आली आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात घडलेला हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हा संपूर्ण प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण एकमेकांच्या घराजवळ राहतात. त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती. आरोपी मैत्रिणी हिने पीडित तरुणी हिला घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेले. पीडित तरुणीला रिक्षात बसवून मैत्रिणीने तिच्या मित्रांना सुद्धा पार्टीसाठी बोलवले होतं. मित्राच्या घरी हा सगळा प्रकार घडला आहे.
पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला दारू पाजली. त्यानं त्यानंतर तिच्या मित्रांनीच तिच्यावर अत्याचार केला. दारूच्या नशेत असलेल्या पीडित तरुणीला या सगळ्या बाबत काहीच कल्पना नव्हती. याचाच फायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला आहे.
चार महिन्यानंतर तिच्या वागणुकीची बदल दिसू लागल्यामुळे घरच्यांनी तिला प्रश्न विचारला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेने राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना पुण्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.