police charged three along with sarpanch in mahavitaran employee case Saam Digital
क्राईम

महावितरण कर्मचा-यास विद्युत खांबाला बांधून ठेवल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

police charged three along with sarpanch in mahavitaran employee case: सरपंचाने लाईनमनला वीज खांबाला बांधले वारंवार वीज जात असल्याने ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर सरपंचांनी ही मर्यादा ओलांडली.

संजय तुमराम

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस औद्योगिक परिसराच्या शेजारी असलेल्या नकोडा गावात भाजप नेते आणि स्थानिक सरपंच किरण बांदुरकर यांनी महावितरण लाईनमनला गावातच वीज खांबाला बांधून दमदाटी केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. यासंबंधी एक व्हिडिओ देखील समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे.

पाेलिसांत दिलेल्या तक्रारीची माहिती अशी : लाईनमन सुरज परचाके यांच्याकडे ऊसगाव आणि नकोडा या दोन गावांचा प्रभार आहे. परचाके तक्रार निवारणासाठी निघाले असताना मार्गात सरपंच किरण बांदुरकर यांनी अडवले व नकोडा येथे नेत स्वतःच्या डोक्याच्या दुपट्ट्याने वीज खांबाला बांधले.

या भागात पोलिसांची गस्त सुरू असताना हा प्रकार त्यांचे लक्षात आला. तब्बल दोन तास बांधून ठेवलेल्या लाईनमनला पाेलिसांनी साेडवले. दरम्यान महावितरण वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत घुग्घुस पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. पाेलिस सरपंच किरण बांदुरकर याचा शाेध घेताहेत. या घटने प्रकरणी एकूण तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT