dhule police arrests two in loot case on mumbai agra highway
dhule police arrests two in loot case on mumbai agra highway  Saam Tv
क्राईम

Dhule Crime News : मुंबई आग्रा महामार्गावर वाहनधारकांना लूटणाऱ्यांना अटक

भूषण अहिरे

Dhule :

मुंबई आग्रा महामार्गावर (mumbai agra highway) वाहनधारकांची लूट करणाऱ्या दोघा सराईतांच्या आझाद नगर पोलिसांनी मोहाडी पोलिसांच्या (mohadi police) मदतीने मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये या चोरट्यांनी लुटलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर वरखेड फाटा या ठिकाणी वाहनधारक सकाळच्या सुमारास आपले वाहन उभे करून वाहनाची सफाई करत असताना दोघा सराईतांनी दुचाकीवरून येऊन चाकूचा धाक दाखवत संबंधिताचा मोबाईल लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती.

या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आझाद नगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता दोघा सराईतांच्या या प्रकरणात आझाद नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सराईतांकडून यापूर्वी देखील इतर ठिकाणी अशाच प्रकारे जबरी लूट केली असल्याचे उघडकीस आले आहे. (Maharashtra News)

धुळे शहरासह मोहाडी पोलिस ठाण्यात या संबंधितांविरोधात तक्रार दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून दोन दुचाकीसह चोरलेला मोबाईल व धारदार शस्त्र हस्तगत केले. पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Hospitalized : कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT