Water Shortage In Pardi : मेहकरमधील पारडी गावात भीषण पाणी टंचाई, महिलांचा हंडा माेर्चा

दरवर्षी आमच्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही करावा लागतोय. पण् यावर्षी टँकर नाही अन् उपाययोजना तर काहीच नाही अशी खंत महिलांनी व्यक्त केली.
water scarcity in pardi mehekar buldhana
water scarcity in pardi mehekar buldhanasaam tv

Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ७० गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. हीच अवस्था मेहकर तालुक्यातील पारडी गावाची झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पारडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तरी ग्रामसेवकाला काही देणे घेणे नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (Maharashtra News)

water scarcity in pardi mehekar buldhana
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

बुलढाणा जिल्हा प्रशासन निवडणुकीत गुंतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भेड्सावणाऱ्या समस्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. पारडी येथील महिला चांगल्याच संतापल्या आहेत. दरवर्षी आमच्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही करावा लागतोय. पण् यावर्षी टँकर नाही अन् उपाययोजना तर काहीच नाही अशी खंत महिलांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in pardi mehekar buldhana
Kalyan Crime News : महाराष्ट्रासह तेलंगणात घरफोडी दोघे गजाआड, कल्याण महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com