police arrests ten in vitthalwadi fighting case near buldhana  saam tv
क्राईम

Holi 2024 : होळी दहन राडा प्रकरणी विठ्ठलवाडीतील 37 जणांवर गुन्हा दाखल,10 जणांना अटक

Buldhana News : मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाच्या कार्यक्रमात दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत.

संजय जाधव

Buldhana :

विठ्ठलवाडीत होळी दहनाच्या कार्यक्रमात दोन गटात वाद झाला. या वादाचे मारामारीत पर्यवसन झाले. यावेळी दाेन्ही गटाकडून लाठी, काठीने मारहाण करण्यात आली. या मारामारीत सात जण जखमी झाले. दरम्यन दाेन्ही गटाच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी सुमारे 37 जणांवर गुन्हा दाखल. या घटनेतील दहा जणांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाच्या कार्यक्रमात दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत.

या घटनेची नाेंद डोनगाव पोलिस ठाण्यात झाली. दाेन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी नाेंदविल्या. यामध्ये 35 ते 37 जणांवर गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. पाेलिसांनी 10 जणांना अटक केल्याची माहिती ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी साम टीव्हीला दिली. दरम्यान या घटनेमुळे विठ्ठलवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

SCROLL FOR NEXT