pune police arrests hostel manager in abhilasha mittal case saam tv
क्राईम

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनीच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समाेर, वसतिगृह चालकास अटक

Pune Latest Marathi News : अभिलाषा मित्तल हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवली हाेती.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune :

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तल या विद्यार्थींनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाेलिसांनी वसतिगृह चालकास अटक केली. सुनील परमेश्वर महानोर असे अटक करण्यात आलेल्या वसतिगृह चालकाचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. (Maharashtra News)

वाशिम येथील अभिलाषा मित्तल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात वास्तव्यास हाेती. तिने ७ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली. अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले हाेते. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या यादृष्टीने पाेलिस तपास करीत हाेते.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिलाषा मित्तल ज्या हाॅस्टेलमध्ये राहत हाेती. तेथील वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याने तिला अनामत रक्कम मागितली तसेच मारहाण केली. याबाबतची तक्रार तिच्या वडिलांनी खडक पाेलिसांत केली. त्यानूसार सुनील महानोर यास अटक केली आहे. अधिक तपास खडक पोलिस करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Maharashtra Tourism: छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलाय स्वर्ग,'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

SCROLL FOR NEXT