police arrests 15 in nashik siemens theft case saam tv
क्राईम

Nashik News : 'सिमेन्स'मधील चोरी प्रकरणाचा चुंचाळे पोलिसांकडून उलगडा, १५ जण अटकेत

नाशिक पाेलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News :

नाशिकच्या अंबड-चुंचाळे एमआयडीसी येथील एक वर्षापूर्वी सिमेन्स कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यास चुंचाळे पोलिस चौकीच्या पथकाला यश आले. पोलीस पथकाने या गुन्ह्यातील ३९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल भंगार व्यावसायिकाकडून जप्त केला. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये सिमेन्स कंपनीतून कॉपर आणि इतर इंडस्ट्रीज साहित्य चोरी झाले होते. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली. त्यांनी कारागृहात असलेल्या तीन संशयितांची नावे सांगितली. या संशयितांची न्यायालयाकडून कस्टडी घेत चौकशी केली. यामध्ये चोरीचा माल एका भंगार व्यावसायिकाकडे ठेवल्याचे समजले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी तपास केला असता भंगार व्यावसायिकाकडून जेसीबी, कॉपर, चारचाकी असा ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण १५ संशयितांना अटक केली आहे. पाेलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

SCROLL FOR NEXT