Dharashiv crime news Saam
क्राईम

Dharashiv Crime: धाराशिवातील बँक दरोडा प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात; माजी कर्मचाऱ्यानेच आखला कट

Dharashiv Crime News: मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ज्योती क्रांती बँकेचा माजी कर्मचारी रमेश दिक्षीत याच्यासह दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

Vishal Gangurde

बालाजी सुर्वे, धाराशीव

Dharashiv Crime News:

धाराशिवातील ज्योती मल्टिस्टेट बँक दरोडा प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ज्योती क्रांती बँकेचा माजी कर्मचारी रमेश दिक्षीत याच्यासह दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना कोर्टाने आता ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टिस्टेट बँक दरोडा प्रकरणातील उलगडा करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या दरोड्याचा मास्टरमाईंड हा याच बँकेतील माजी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी माजी कर्मचारी रमेश दिक्षीत याच्यासह नवी मुंबईच्या नेरूळ येथील प्रशांत शिंदे,उदयन वल्लीकालाईन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांच्या अटकेनंतर धाराशिव न्यायालयाने आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दिक्षीत यांच्याकडून 1 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 50 लाख रुपये आहे. तर झटपट श्रीमंत होण्यासाठी दिक्षीत याने दरोड्याचा मार्ग स्वीकारत प्लॅनिंग केली होती.

दरम्यान धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने अवघ्या 10 दिवसात गुन्ह्याची उकल करत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे.

चाकूचा धाक दाखवून मोबाईलची चोरी, तिघे ताब्यात

तीन चोरटयांनी लघुशंकेसाठी थांबलेल्या कृष्णा शेठ या तरुणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल आणि १ हजाराची रोख रक्कम हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात ही घटना घडली आहे.

छावणी पोलिसात याचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तांत्रिक मदत आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. त्यानंतर अवघ्या काही तासांत मालेगाव शहरातील मजहर खान शरीफ खान,शहजाद अखत्र हमीद खान आणि मोहम्मद इरफान खलील अहमद या तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे आणखी सहा मोबाईल जप्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT