police arrest three in 18 lakh theft case of onion growers saam tv
क्राईम

Satara Crime News : पुण्यातील शेतकऱ्यांचे 18 लाख लुटले, साता-यात तिघे जेरबंद

सातारा पाेलीसांनी 48 तासांत घटनेचा तपास केला.

ओंकार कदम

Satara News :

18 लाखाचा कांदा विकून शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांच्या सातारा पोलीसांनी (satara police) मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पाेलीसांनी माल वाहतुक गाडीच्या चालकासह एकूण तीन जणांना अटक केली आहे. (Maharashtra News)

किरणकुमार सूर्यवंशी (उपविभागीय पोलिस अधीक्षक) यांनी दिलेल्या माहितीनूसार दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 18 लाख रुपयांची चोरी साताऱ्यातील वाढे फाटा येथे झाली होती. कांदा उत्पादक शेतकरी बेळगाव येथे कांदा विकून पुन्हा पुण्याला निघाले हाेते.

त्यांच्या वाहनातून चोरट्यांनी 18 लाख रुपये लंपास केले होते. त्याबाबत पाेलीसांत तक्रार नाेंदवली गेली हाेती. सातारा पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. शेतकऱ्यांचा सोबत असणा-या वाहन चालकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे असे सूर्यवंशी यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT