POCSO Court x
क्राईम

POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

POCSO Court : एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महिलेला पोक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने महिलेला दोषी करार देत दंडदेखील ठोठावला आहे.

Yash Shirke

  • अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाने महिलेला २० वर्षांची शिक्षा सुनावली.

  • न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवत १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

  • उदयपूरमध्ये महिलेला दोषी ठरवलेला हा पोक्सो कायद्यानुसार पहिलाच खटला आहे.

Shocking : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधील पोक्सो न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. उदयपूरमध्ये महिला आरोपीला पोक्सो कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आलेला हा पहिलाच खटला आहे. या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी आरोपी महिलेवर अनेक आरोप केले आहेत. या महिलेने त्याच्या मुलाला तिच्यासोबत ठेवले होते. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले होते आणि त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जात आरोपीने त्याचे लैंगिक शोषण केले होते, असे आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केले आहेत. या प्रकरणात महिला दोषी ठरली आहे.

विशेष सरकारी वकील महेंद्र ओझा यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ही घटना २०२३ मध्ये घडली, त्या वेळेस १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलाला शोधून काढले आणि मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्त केले. यादरम्यान महिलेने मुलाचे शोषण केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

खटल्यादरम्यान न्यायालयाने २८ पुरावे, दोन वस्तू आणि १५ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. या पुराव्याच्या आधारे, पीठासीन अधिकारी संजय भंडारी यांनी आरोपी महिलेला दोषी ठरवले आणि तिला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आरोपीला १० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. उदयपूरमध्ये आतापर्यंतचा हा एकमेव खटला आहे जिथे पोक्सो न्यायालयाने एका महिलेला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती ओझा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT