Wife killed husband  Saam tv
क्राईम

Wife killed Husband : बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या; १ कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवरही होता डोळा

Pimpri Chinchwad wife killed husband : पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News :

पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी येथे राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राहुल सुदाम गाडेकर यांच्या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पोलिस पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. याची माहिती राहुल गाडेकर याला झाल्याने दोन्ही नवरा-बायकोमध्ये सतत भांडण होत होते. त्यामुळे सुप्रिया येणे तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि सुरेश पाटोळे यांचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला.

राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपुर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाच टर्म इन्शुरन्स काढला होता, याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याची वेबनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडगे यांना देणार होती. त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.

राहुल गाडेकर याची हत्या केल्यानंतर सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता, तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता. आता या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत. तसचे त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भादवी 302 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT